पावसाची विश्रांती; मात्र मतदाराचा प्रतिसाद कमी

पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

दरम्यान, दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने आज मतदाना दिवशी विश्रांती घेतली आहे. मात्र मतदाराचा हवा तितका प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. सकाळी 9 पर्यंत पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये केवळ 2.5 टक्के मतदान झाले. तर पुण्यातील कोथरूडमध्ये पहिल्या 2 तासात सर्वाधिक 5 टक्के मतदान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.