पुणे -राज्यात मान्सून सक्रिय नसला, तरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही ठिकाणी पाऊस पडत आहे. पुण्यातही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून, मंगळवारीही हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडेल, असा अंदाज हवमान विभागाने दिला आहे.
सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडत आहे. सोमवारी शहरातील मुख्य पेठा, कात्रज, सिंहगड रस्ता, कोथरूड, खडकवासला अशा बहुतांश भागांत पाऊस झाला. तसेच पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.