इंडियाना जोन्स या फ्रॅन्चायजीच्या पाचव्या सिनेमाचे शुटिंग सध्या ब्रिटनमध्ये सुरू आहे. मात्र पहिल्यापासून या फ्रॅन्चायजीमध्ये काम करत असलेले दिग्गज अभिनेते हॅरिसन फोर्ड यांना या शुटिंगच्यावेळी दुखापत झाली असून त्यांचा खांदा दुखावला आहे.
एका स्टंटच्या रिहर्सलच्यावेळी त्यांना ही दुखापत झाली. मात्र या सीनच्या वाळी केलेले शुटिंग अबाधित आहे. त्याच्या आधारेच पुढे शुटिंग सुरू ठेवण्यात येणार आहे. पुढील शुटिंगदेखील वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे.
मात्र हॅरिसन फोर्ड हे त्यात नसतील. योग्य उपचार घेतल्यानंतर त्यांना त्या शूटिंगमध्ये सहभाग करून घेतले जाणार आहे. आहे. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारते आहे.
फोर्ड यांच्या या दुखापतीमुळे शुटिंगचे थोडे नियोजन काही आठवड्यांसाठी बदलण्यात आले आहे, असे निर्मात्यांनी म्हटले आहे मात्र फोर्ड यांच्या दुखापतीबाबत कोणताही तपशील देण्यात आलेला नाही.
या सिनेमाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. इंडियाना जोन्सत्या पहिल्या सिनेमाच्या शुटिंगला 40 वर्षे पूर्ण होत असतानाच, पाचव्या सिनेमाचे शुटिंग सुरू झाले आहे.