नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी उद्यापासून (दि. १६) वायनाड दौऱ्यावर जाणार आहेत. राहुल गांधी हे केरळ येथील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून ते उद्यापासून पुढील तीन दिवस आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतील.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी २०१९ लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीसह केरळातील वायनाड येथून देखील लढवली होती. अमेठी येथे त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता.
राहुल गांधी यांच्या वायनाड दौऱ्याची माहिती काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आली आहे. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गांधी यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. अशातच पावसाळी अधिवेशन समाप्त होताच गांधी वायनाड दौऱ्यावर जात असल्याचं पक्षाने जाहीर केलं आहे.
Congress leader Rahul Gandhi will be on a 3-day visit to his parliamentary constituency Wayanad in Kerala, starting August 16
(File photo) pic.twitter.com/Qw82OlE07n
— ANI (@ANI) August 15, 2021