कोल्हापूर- रिंगरोड येथील महानगरपालिकेच्या डॉ.द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टॅंकचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रतिदिनी 150 सिलेंडर क्षमतेइतक्या उत्पादनाचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून यासाठी सुमारे 80 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासणार आहे त्यांना या ऑक्सीजन प्लँटमुळे ऑक्सिजनची उपलब्धता होणार असल्याने रुग्णावर वेळीच उपचार करणे या प्लँटमुळे शक्य होणार आहे.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, माजी महापौर निलोफर आजरेकर, शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, अश्विनी बारामते, वृषाली दुर्वास कदम, भूपाल शेटे, राहुल माने, , रविकांत अडसूळ, आदी उपस्थित होते.