Rahul Gandhi Brings Home New Pet Dog Noorie : काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहे, मात्र यावेळी त्यांच्या कोणत्याही वक्तव्यामुळे नाही तर नव्या पाळीव प्राण्याच्या नावामुळे अडचणीत सापडले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने नूरी या पिल्लाचे नाव देण्यावर आक्षेप व्यक्त केला आहे.
नुकतेच राहुल गांधी गोवा दौऱ्यावर होते, आणि तेथून ते आपल्यासोबत एक पिल्लू घेऊन आले होते. दिल्लीत परतल्यानंतर जागतिक प्राणी दिनानिमित्त राहुल गांधींनी हे पिल्लू आई सोनिया गांधी यांना भेट म्हणून दिले. सोनिया गांधींना हे पिल्लू खूप आवडले आणि तिचे त्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कुटुंबीयांनी तिचे नाव नूरी ठेवले आहे.
‘इस्लाम धर्मातील लाखो मुलींचा अपमान’
आता नूरी या नावावरून वाद निर्माण झाला आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने हा महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. AIMIM चे प्रवक्ते मोहम्मद फरहान म्हणाले, “कुत्र्याला नूरी असे नाव देऊन इस्लाम धर्मातील लाखो मुलींचा अपमान करण्यात आला आहे.”
नूरी नावाच्या या पिल्लाची जॅक जॅक रसेल टेरियरची आहे. राहुल गांधींनी ते ‘शेड्स केनेल’ नावाच्या डॉग हाऊसमधून घेतले जे शरवाणी पित्रे नावाची महिला चालवते. त्या पेट डॉग्सचे काम करतात. असे म्हणतात की जॅक रसेल टेरियर ही ब्रिटनची प्रसिद्ध जात आहे. त्याचे वजन 4-7 किलो आणि उंची सुमारे 25 सेमी आहे. राहुल गांधी ऑगस्टमध्ये खास पाळीव कुत्रा विकत घेण्यासाठी गोव्यात गेले होते, असेही सांगण्यात येत आहे. त्यांना कुत्र्याची पिल्ले खूप आवडतात. दरम्यान नूरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.