Aadhaar Card Update : देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आधार आणि इतर कागदपत्रांच्या माहितीचा गैरवापर करून गुन्हेगार मोठी फसवणूक करत आहेत. याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. तुम्ही तुमच्या आधारला फसवणुकीपासून वाचवू शकता. यासाठी तुम्हाला काही सेटिंग्ज अपडेट करावी लागतील.
आधार हे एक असे कागपत्र आहे जे आता बहुतेक ठिकाणी वापरले जात आहे. सरकारी कामांबरोबरच खासगी कामांसाठीही आधारचा वापर केला जात आहे. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे पूर्ण होणार नाही. आधार हा 12 अंकी क्रमांक आहे, जो डिजिटली अथवा फिजिकली वापरला जाऊ शकतो. अशात तुम्हीही फसवणुकीचे बळी होऊ शकता.
adhar card lock – तुमच्या आधारचा दुरुपयोग होण्यापासून तुम्ही कसे वाचू शकता
फसवणूक टाळायची असेल तर बायोमेट्रिक माहिती आधारमध्ये लॉक करावी. बायोमेट्रिक माहिती लॉक केल्यानंतर, तुमच्या आधारशी संबंधित माहिती कोणालाही मिळू शकणार नाही. मात्र, जेव्हा तुम्हाला आधार वापरायचा असेल, तेव्हा तुम्ही ते पुन्हा अनलॉक करून वापरू शकता. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी होईल.
adhar card lock- अशी करा सेटिंग
-सर्वप्रथम तुम्ही आधार अॅप डाउनलोड करावे
-तुम्हाला आधार अॅपच्या शीर्षस्थानी “Register My Aadhaar” वर क्लिक करावे लागेल.
-आता तुम्हाला चार अंकी पासवर्ड तयार करावा लागेल
-यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आणि कैप्चा सिक्योरिटी द्यावी लागेल.
-नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल
-OTP टाकल्यानंतर तुमचे आधार खाते उघडले जाईल.
-आता खालील “बायोमेट्रिक्स लॉक” वर क्लिक करा
-पुन्हा एकदा तुम्हाला कॅप्चा आणि ओटीपी टाकावा लागेल
-ओटीपी वेरीफाई केल्यानंतर, तुमचे बायोमेट्रिक लॉक केले जाईल.
आधुनिक काळात आधारशी संबंधित अनेक कामे केली जात आहेत. आताही आधारच्या माध्यमातून खात्यातून पैसे काढले जात आहेत. अशात तुम्ही आधार लॉक न केल्यास तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात.