Rahul Gandhi Nomination । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केरळमधील वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी साठी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी याआधी त्यांनी रोड शो करत शक्तिप्रदर्शन केले. ज्यात त्यांच्यासोबत काँग्रेस सरचिटणीस आणि त्यांची बहीण प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.
मागील 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाडची जागा चार लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकली होती. आज सकाळी राहुल गांधी हेलिकॉप्टरने वायनाडमधील मुप्पैनड या गावात आले. त्यानंतर त्यांनी कलपेट्टाला गेले. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी,केसी वेणुगोपाल, दीपा दास, कन्हैया कुमार आणि राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन, केपीसीसीचे कार्याध्यक्ष एमएम हसन उपस्थित होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी या सर्व नेत्यांसह सकाळी 11 च्या सुमारास कालपेटा येथून रोड शो सुरू केला.
‘विचारधारेत फरक असू शकतो पण..”Rahul Gandhi Nomination ।
यावेळी राहुल गांधी म्हणाले, “तुमचा खासदार होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी तुम्हा सर्वांना माझी धाकटी बहीण प्रियंका सारखी मानतो. केंद्र आणि केरळमध्ये आमचे सरकार असेल तेव्हा आम्ही तुमचे सर्व प्रश्न सोडवू. मग तो UDF असो किंवा LDF, सर्वजण माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत.. विचारधारेचा फरक असला तरी. गेल्या पाच वर्षात मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.”
रोड शोनंतर उमेदवारी अर्ज दाखल Rahul Gandhi Nomination ।
रोड शोमध्ये हजारो काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. रोड शो सिव्हिल स्टेशनजवळ दुपारच्या सुमारास संपला, त्यानंतर राहुल गांधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या बहीण प्रियांका गांधी देखील हजर होत्या. दम्यान, याठिकाणावरून राहुल गांधींविरोधात भारतीय जनता पक्षाने के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी वायनाडमध्ये मतदान होणार आहे. या तारखेला 13 राज्यांतील 89 जागांवर मतदान होणार आहे.