नवी दिल्ली – मागील आठवड्यात बिहार सरकारने जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता काॅंग्रेस शासित राज्यांमध्ये जात जनगणना करण्याचा निर्णय काॅंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी याबाबत घोषणा केली आहे.
सोमवारी काँग्रेस कार्यकारिणी (CWC) चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये पक्ष जात जनगणना करणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
CWC बैठकीत जात जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे राहुल गांधी राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेस शासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे.