न्यूयॉर्क : अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. कारण अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. एका जनरल स्टोअरमध्ये तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा हल्ला वांशिक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्लेखोर कृष्णवर्णीय लोकांचा तिरस्कार करत असल्याने हा वांशिक हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. यावर बोलताना, हल्ल्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर देखील गोळी झाडली. प्राथमिक तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हल्लेखोर द्वेषयुक्त विचारसरणीने प्रभावित होता, हेच या हल्ल्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जॅक्सनव्हिलमध्ये झालेल्या हल्ल्यात किती लोक जखमी झाले याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
A man armed with a high-powered rifle and handgun killed three people at a Dollar General store in Jacksonville, Florida, before shooting himself, in what local law enforcement described as a racially motivated crime, reports Reuters
— ANI (@ANI) August 26, 2023
अमेरिकेतील बोस्टन येथे शनिवारी सकाळी प्रसिद्ध बोस्टन परेड दरम्यान गोळीबार झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या गोळीबारात सात जण जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्याने परेड थांबवावी लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कोणाच्याही जीवाला धोका नाही. या घटनेनंतर दोन संशयितांना अटक करण्यात आली असून शस्त्रेही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.