Stock Market Opening : आरबीआयने केलेल्या आर्थिक धोरणाच्या घोषणेनंतर काल भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. विशेषत: कालच्या सत्रात बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. त्याचाच परिणाम आजदेखील दिसून आला.
शेअर बाजाराने आज शांतपणे सुरुवात केली असून सेन्सेक्सची सुरुवात थोड्या घसरणीने झाली आहे. याशिवाय NSE चा निफ्टी फ्लॅट ओपनिंगसह दिसला आहे. मीडिया, मेटल, रियल्टी आणि वित्तीय सेवा क्षेत्रात घसरण दिसून येत आहे.
बीएसई सेन्सेक्स 18.14 अंकांनी घसरून शेअर बाजार 71,410 वर उघडला आहे. तर NSE चा निफ्टी 9 अंकांच्या वाढीसह 21,727 च्या पातळीवर उघडला असल्याचे पाहायला मिळाले.