Preity Zinta No Makeup Look : अभिनेत्री प्रीती झिंटा 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होती. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. आपल्या अभिनयासोबतच या तिने आपल्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य केले. तिच्या गालावर असलेल्या डिंपल्समुळे तिला बॉलिवूडची डिंपल गर्ल अशी ओळख मिळाली. ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्रितीने नुकताच एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
प्रिती झिंटाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो ‘दिल से’ या डेब्यू चित्रपटाच्या सेटवरील आहे. प्रीतीने फोटोसोबत एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे. ज्यामध्ये तिने त्यावेळचा एक किस्सा शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रितीने लिहिले की, ‘हे फोटो पहिल्या दिवशी दिल सेच्या सेटवर काढण्यात आले होते.’
फोटो प्रीतीच्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्या काळातील आठवण करून दिली आहे. हा प्रसंग शेअर करताना तिने लिहिले की, “मणीरत्नम सर आणि शाहरुख खानसोबत काम करायला मी खूप उत्सुक होते. जेव्हा मणी सरांनी मला पाहिले तेव्हा ते हसले आणि नम्रपणे मला तोंड धुण्यास सांगितले, ज्यावर मी म्हणाले…. पण सर… माझा मेकअप उतरेल. मग सर म्हणाले, मला हे नक्की हवे आहे… तुझा चेहरा धु… मला वाटले की ते विनोद करत आहे…. तेव्हा मला कळले की ते मस्करी करत नव्हते ..!!!’.
पुढे, प्रितीने लिहिले, ‘मी धुतलेल्या चेहऱ्याने चित्रपट केला. चित्रपटासाठी प्रीती झिंटाला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटासाठी तिचा नो मेकअप लूक कामी आला. प्रीतीने 1998 मध्ये आलेल्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. चित्रपटातील त्यांची भूमिका छोटी पण अप्रतिम होती.’