Pushkar Mela: राजस्थानमधील (Rajasthan) अजमेर (Ajmer) जिल्ह्यातील पुष्कर हा सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कारण याठिकणी आंतरराष्ट्रीय पुष्कर मेल्याचे (Pushkar Mela) आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात एका म्हशीने सर्वाचे लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या म्हशीची किंमत एकूण तुम्हाला धक्का बसेल. होय, या म्हशीची किंमत तब्बल 11 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. ही म्हैस सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
‘अनमोल’ असे या म्हशीचे नाव (Anmol buffalo) आहे. म्हशीच्या मालकानं दिलेल्या माहितीनुसार, तिच्या देखभालीवर दरमहा अडीच ते तीन लाख रुपये खर्च करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळ्यात कोटयवधींच्या म्हशीं विक्री होतेय. पण या जत्रेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे म्हैस अनमोल. हरियाणा (सिरसा) येथून आलेल्या या म्हशीच्या मालकाने तिची किंमत 11 कोटी रुपये ठेवली आहे.
अनमोलची देखभाल करण्यावर दरमहा मालकाचा अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो असा दावा करण्यात आला आहे. अनमोल म्हैस ही 5.8 फूट उंच आणि मुर्रा जातीची आहे. अनमोलचे वजन हे सुमारे 1570 किलो आहे. गेल्या वर्षी अनमोलचे वजन 1400 किलो होते.
अनमोलचा आहार आणि इतर खर्च मिळून प्रत्येक महिन्याला 2.50 ते 3 लाख रुपये खर्च होत असल्याचा दावा मालक हरविंदर यांनी केला आहे. म्हशीला दररोज एक किलो तूप, पाच लिटर दूध, एक किलो काजू-बदाम, चणे आणि सोयाबीन दिले जाते. दोन लोक नेहमी या म्हशीसोबत राहतात, ज्यासाठी त्यांना वेगळा पगार दिला जातो. गेल्या वर्षी अनमोल आणली तेव्हा तिची किंमत अंदाजे 2.30 कोटी रुपये होती. पण, विक्री करण्यास नकार दिला. यावेळी अनमोलची किंमत 11 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.
मुर्रा जातीची म्हैस ही तिची शिंगे आणि आकारावरुन ओळखली जाते. हरविंदरने दिलेल्या माहितीनुसार, अनमोलला होणारी रेडके हा चांगल्या स्थितीत असतात. मुख्यतः अनमोलचा वापर हा रेडकांच्या प्रजननासाठी केला जातो. दरम्यान, मुर्रा जातीच्या म्हशीला जास्त मागणी आहे. हरविंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या झज्जर मेळ्यात ही म्हैस चॅम्पियन ठरली आहे.