पुणे (प्रतिनिधी)- शहरातील पिंपरी सांडस परिसरात दरोड्याच्या तयारीतील पाच जणांच्या सराईत टोळीला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केले. त्यांच्या ताब्यातून कोयता, दोरी, मिरचीपडू, मोबाईल, दुचाकी असा ७८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
राजन गोपाल नायर (वय.३१,रा. उत्तमनगर), राहूल गोटीराम साळूंखे (वय.३३), आकाश तायप्पा कानडे (वय.२१,रा. वडारवस्ती येरवडा), अक्षय मधुकर कोळके (वय.२७,रा.धायरी),सुरज जाधव (वय.२८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस कर्मचारी ऋषीकेश रविंद्र व्यवहारे (वय.३०) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी सांडस गावच्या हद्दीतील सार्वजनिक रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी दबा धरून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे धारधार शस्त्रे व दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य मिळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट सहा करत आहे.
कोंढवा खुर्दमध्ये पावने दोन लाखांचा ऐवज चोरीला पुणे- बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिणे असा १ लाख ७६ हजारांचा ऐवज चोरी केला. ही घटना दोन दिवसांपुर्वी कोंढवा खुर्दमधील हिरा हाईट्स सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी सिकंदर सैय्यद (वय.४०,रा. कोंढवा खुर्द साईबाबा नगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ए.के. चाऊस करीत आहेत.