मुंबई – श्रीलंकेत भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून गेलेल्या राहुल द्रविड यांच्यावर अन्य जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच बीसीसीआयने केले आहे.
माजी कर्णधार द्रविड हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक होते. मात्र, आता त्याची मुदत संपुष्टात आली असून त्यांना याच पदावर फेरनियुक्ती हवी असल्यास त्यांना फेरअर्ज करावा लागणार आहे.
मात्र, द्रविड यांनीच बीसीसीआयकडील या पदावर कार्यरत राहण्यास अनुकूल नसल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या पदासाठी नवीन व्यक्तीची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत.
द्रविड जर या पदावर कायम राहिले तर त्यांना मोठी जबाबदारी सोपवता येणार नाही, असे व्यक्त करताना बीसीसीआयने कदाचित सध्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची उचलबांगडी होणार असल्याचेही संकेत दिले आहेत.