पुणे(प्रतिनिधी) – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगडेवाडी येथील खूनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने -1 बारा तासाच्या आत दोघा आरोपींना अटक केली आहे. यामधील एक आरोपी माजी सरपंच आहे.
विकास रमेश चव्हाण (रा.गुजरवस्ती कात्रज, पुणे, सचिन जालिंदर डाकले (रा.उत्कर्ष सोसायटी, कात्रज ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांनी मोहन संपत चवडकर याचा खून केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चवडकर याचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्याचा गुन्हा बुधवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
या गुन्हयाचा समांतर तपास खंडणी विरोधी पथक करत होते. पथकातील पोलीस नाईक संजय भापकर यांना मिळालेल्या खबरीवरुन आरोपी हे गुन्हा करुन सातारा रोड शिरवळ फाटा येथे निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यानूसार सापळा रचून आरोपी विकास रमेश चव्हाण
व सचिन जालिंदर डाकले यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
असा केला खून……
त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता, मंगळवारी रोजी रात्री 11. वा. चे सुमारास आरोपी विकास रमेश चव्हाण, सचिन जालिंदर डाकले व मयत मोहन संपत चवडकर असे दारु पित बसले होते. यावेळी आरोपी विकास रमेश चव्हाण याने मध्यस्थी करुन घेऊन दिलेल्या प्लॉटवर लाईट व इतर सुविधा उपलब्ध करुन न दिल्याचे कारणावरुन मयत मोहन संपत चवडकर याने आरोपींना शिवीगाळी केली.
यामध्ये त्यांच्यात झटापट झाली. आरोपी विकास व सचिन यांनी मोहन चवडकर यांस बांधकाम साईटवरील विटांनी मारहाण करुन त्याचा खुन केला. आरोपी विकास रमेश चव्हाण हा मौजे पेजरवाडी (ता.भोर) या ग्रामपंचायतचा माजी सरंपच असुन सध्या विद्यमान सदस्य आहे.
ही कारवाई कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, पोलीस अंमलदार संजय भापकर, अतुल साठे, प्रवीण रजपूत, मधुकर तुपसौंदर,फुलपगारे, हेमा ढेंबे, पो.ना.नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, अमर पवार, पिराजी बेले यांनी ही कारवाई केली.