50 दिग्गज कलाकारांशी राज ठाकरेंची चर्चा, “तुमच्या समस्या लगेच मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो”

मुंबई – मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी सध्याच्या करोना काळात मराठी करमणूक क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेतला. राज ठाकरे यांनी आज (दि. 20) ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून नाटक, चित्रपट, संगीत आणि टीव्ही मालिका क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक दिग्ज कलाकारांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्याही समजावून घेतल्या.

चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी राज ठाकरे यांनी यावेळी संवाद साधला. तातडीच्या मागण्यांविषयी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी दिलं.

ऑनलाईन मिटींगमध्ये कोणाकोणाचा सहभाग होता…

 • मनसे – अध्यक्ष राज ठाकरे
 • महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष – अमेय खोपकर
 • मनसे नेते – अमित ठाकरे
 • स्टार प्रवाह वाहिनीचे प्रमुख – दिग्दर्शक सतीश राजवाडे
 • निर्माते दिग्दर्शक – महेश कोठारे
 • निर्माते दिग्दर्शक – महेश मांजरेकर
 • निर्माते अभिनेते – प्रशांत दामले
 • दिग्दर्शक – केदार शिंदे
 • अभिनेता – अंकुश चौधरी
 • अभिनेता दिग्दर्शक – पुष्कर श्रोत्री
 • अभिनेता दिग्दर्शक – प्रसाद ओक
 • अभिनेता – सचित पाटील
 • संगीतकार – राहुल रानडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.