कोलकाता : बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंहची आई आदिती सिंग यांचे आज करोनामुळे निधन झाले आहे. त्यांना A निगेटिव्ह ब्लडची आवश्यकता होती दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर कोलकाता येथिल रुग्णालयात उपचार सुरु असताना उपचारादम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
अरिजीतच्या आई गेल्या काही दिवसांपासून ECMO वर होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्तीचे प्रर्यंत केेले मात्र गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिक ढासळली. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
अरिजीतच्या आईला A निगेटिव्ह ब्लडची आवश्यकता असल्याचे व्टिट अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने केले होते यामध्ये, “गायक अरिजीत सिंगच्या आईला A निगेटिव्ह ब्लडची आवश्यकता आहे, त्यांना आमरी रुग्णालय, ढकुरीया येथे दाखल करण्यात आले असून आज A निगेटिव्ह ब्लडची आवश्यकता आहे. कृपया संपर्क साधा,” असे सस्तिकाने आवाहन केले होते मात्र आदिती सिंग यांची प्रकृती खूपच खालावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. निधनाची बातमी कळताच बॉलिवूडसह देश भरातून दु:ख व्यक्त केले जात आहे.