विश्रांतवाडी -महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि युवक प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट युवक कॉंग्रेसचे यशस्वी अध्यक्ष म्हणून राहुल शिरसाठ यांचा सन्मान करण्यात आला.
दादर येथील टिळक भवन येथे झालेल्या बैठकीस इनचार्ज कृष्णा अल्लवरू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यपुणे शहर युवक कॉंग्रेस राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली नोटबंदी, कृषी कायदेशी, अन्यायकारक जीएसटी, संसदेतील सत्ताधारी पक्षाची हूकूमशाही, महिला कुस्तीपटूवरील अत्याचार विरोधी आंदोलनात आवाज उठविण्यात आला होता. राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही पुणे शहर युवक कॉंग्रेसचा मोठा सहभाग होता.
राहुल गांधी यांच्या संघर्षात पुणे शहर युवक कॉंग्रेस सर्वार्थाने सहभागी आहे. सत्ताधारी मंडळींशी पुणे शहर युवक कॉंग्रेस सनदशीर मार्गाने संघर्ष करेल. हा पुरस्कार केलेल्या कामाची पावती आहे. पुढील कामासाठी प्रेरणा ही आहे, असे पुणे शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ म्हणाले.