पुणे – राज्यातील शिक्षण पद्धतीतील अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासाठी “स्टार्स’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 38 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबवला जात आहे.
परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समधील कामगिरीआधारे हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ या सहा राज्यांची “स्टार्स’ प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र शासनाने निवड केली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पाच वर्षाकरिता 976 कोटी 39 लाख रुपये मंजूर करण्यात आले. प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 60 टक्के म्हणजेच 585 कोटी 83 लाख रुपये तर राज्य शासनाकडून 40 टक्के म्हणजेच 390 कोटी 56 लाख रुपयांचा निधी वाटपाचा हिस्साही निश्चित करुन देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडून वितरीत होणाऱ्या निधीस सन 2020-21 ते सन 2024-25 या कालावधीसाठी मान्यताही देण्यात आलेली आहे. मार्च 2021 पासून प्रकल्पास सुरुवात झालेली आहे.
केंद्र शासनाकडून सन 2022-23 या वर्षातील आपल्या निधीचा हिस्सा उपलब्ध करुन दिला आहे. यात केंद्र हिस्सा 22 कोटी 46 लाख रुपये तर राज्य हिस्सा 14 कोटी 97 लाख रुपये इतका निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे वितरित करण्यासही मंजुरी मिळाली आहे.