पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मोफत लसीकरणाच्या केलेल्या घोषणेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी लसीकरणासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. याशिवाय साडेसातशे ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान लसींची किंमतही जाहीर केली आहे.त्यापेक्षा जास्त रक्कम खासगी रुग्णालयांना घेता येणार नाही.
खासगी रुग्णालयांना मिळणार लस
लस निर्मिती कंपन्यांना 25 टक्के लस खाजगी रुग्णालयांना देता येणार आहेत. यासाठी रुग्णालयांना किंमती ठरवून देण्यात आल्या आहेत.
“कोविशील्ड’ लसीची किंमत कंपनीने 600 रुपये ठरवली आहे. त्यामध्ये पाच टक्के जीएसटी म्हणजे 30 रुपये आणि युजर चार्जेस 150 रुपये असे 750 रुपये किंमत ठरवण्यात आली आहे.
“कोवॅक्सिन’लसीची किंमत 1200 रुपये कंपनीने ठरवली आहे. त्यामध्ये पाच टक्के जीएसटी म्हणजे 60 रुपये आणि 150 युजर चार्जेस मिळून एकूण 1,410 रुपये किंमत ठरवण्यात आली आहे.
स्पुटनिक-व्ही लसीचाही समावेश करण्यात आला असून, तिची कंपनीने ठरवलेली 948 रुपये किंमत, जीएसटी पाच टक्क्यानुसार 47 रुपये आणि 150 रुपये युजर चार्जेस अशी 1,145 रुपये किंमत ठरवण्यात आली आहे.
“म्युकरमायकोसिस’वरील इंजेक्शनचे
वितरण जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खासगी रुग्णालयांना वितरित करण्यात येणारी म्युकरमायकोयिस आजारावरील ऍम्फोटेरिसिन-बी हे इंजेक्शन आता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत वितरीत केले जाणार आहे. शासकीय व महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांसाठी मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे. राज्य शासनाने या इंजेक्शन वितरणाची नवी कार्यपद्धत निश्चित केली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
करोना बाधित मातेचे सुखरूप बाळंतपण करून, बाळांना वाचवण्यात यश आले. ते त्यांच्या गावी जाऊन महिना झाला. तिन्ही बाळ सुखरूप असून, त्यांचे वजनही वाढल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. काही कालावधीच्या निरीक्षणांनंतर आता हे तिळे पूर्णपणे धोक्याच्या पातळीबाहेर आल्याने चांगली गोष्ट झाली आहे.
– प्रा. डॉ. आरती किणीकर, बालरोग विभागप्रमुख, “ससून’