नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर आली आहे. आजपर्यंत देशात माणसांत आढळणारा करोना विषाणू आता प्राण्यांमधे आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
चेन्नईजवळ असलेल्या वंडलूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयात एका सिंहिणीचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे सिंहिणीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आहे. तसेच 9 सिंह हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सिंहापाठोपाठ आता हत्तींची देखील करोना चाचणी करण्यात आली आहे. सिंहानंतर आता 28 हत्तींची करोना चाचणी करण्यात आली आहे.
Tamil Nadu | 28 elephants at Mudumalai Tiger Reserve tested for COVID19
“Samples have been sent to Indian Veterinary Research Institute in Uttar Pradesh. All elephants between 2 and 60 years of age were tested, results awaited,” says Forest Ranger, Theppakadu Elephant Camp pic.twitter.com/o11brqS9gO
— ANI (@ANI) June 8, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या मदुमलाई टायगर रिझर्व्हमधील हत्तींना करोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. येथील तब्बल 28 हत्तींची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या हत्तींचे नमुने हे उत्तर प्रदेशच्या इंडियन वेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहेत. सर्व हत्ती 2 ते 60 वयोगटातील आहेत. त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. हत्तींची करोना चाचणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
प्राणिसंग्रहालयातील 9 वर्षांच्या निला नावाच्या सिंहिणीचा 3 जून रोजी मृत्यू झाला. एक दिवसापूर्वीच तिच्या नाकातून स्त्राव येत होता, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते.
प्राणिसंग्रहालयातील 11 पैकी 9 सिंहांचा करोना चाचणी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे पाठवण्यात आले आहेत. सध्या सर्व सिंहांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.