पुणे –“आरआरबी’ परीक्षेसाठी रेल्वेत होणारी विद्यार्थ्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता खास परीक्षेसाठी नागपूर ते सिंकदराबाद मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. 7 मे रोजी ही “परीक्षा विशेष एक्स्प्रेस’ धावणार आहे.
7 मे (शनिवारी) रोजी ही एक्स्प्रेस नागपूरहून दुपारी 1.30 वाजता सुटणार असून, भुसावळ, कल्याण, पनवेल, लोणावळामार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता पुणे रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. तर त्याचदिवशी रात्री 9.45 वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल. 9 मे (सोमवारी) विशेष एक्स्प्रेस सिकंदराबादहून रात्री 8.30 वाजता सुतणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता पुण्यात पोहोचेल. तर लोणावळा, पनवेल, कल्याण, भुसावळ मार्गे तिसऱ्या दिवशी पहाटे नागपूर येथे पोहोचणार आहे. या रेल्वेमध्ये 4 सामान्य आणि 9 स्लीपर कोचेस असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.