पुणे – तगडा पोलीस बंदोबस्त आणि भाजप कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व गोंधळात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अखेर महापालिकेत दाखल झाले आहेत. महापालिकेत आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पायरीवर जाऊन सत्कार करण्यास परवनगी नाकारल्यानंतर ते महापालिकेत मोठ्या गोंधळात दाखल झाले. त्यानंतर भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने प्रवेशद्वारावर जमा झाले होते. त्यानंतर पालिकेत एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, पालिकेच्या बाहेर भाजप पक्ष कार्यालय समोर भाजपने वाजत गाजत त्यांचे स्वागत केले. तर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालिकेच्या प्रवेशद्वारावर जमल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. त्यावेळी थोडी चेंगरा चेगरी झाल्याने थोडा गोंधळ उडला होता.