वाल्हे -पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी मूर्तींना सोमवती अमावास्या निमित्त नीरास्नान घालण्यात आले.
वाल्हे येथील संत सावता महाराज मंदिरा असणारे श्री भैरवनाथांची काठी व कुंभारवाडा येथे असणाऱ्या श्री ग्रामदैवत यांच्या मूर्ती पालखीमध्ये ठेवून मुख्य बाजारपेठेतून वाजत-गाजत, गुलालाची मुक्त उधळण करीत पारंपरिक ढोलांच्या तालावर उत्सवमूर्तींना गावांतर्गत पालखीची व श्रींच्या कावडीची पारंपरिक वाद्यांच्या तालावर सवाद्य मिरवणूक काढुन “नाथ साहेबाचं चांगभलं’ च्या जयघोषात ढोल ताशा व सनईच्या तालावरती ग्रामप्रदक्षिणा मारून श्री भैरवनाथ मंदिरात आणण्यात आले.
मंदिर प्रदक्षिणा होऊन समाज आरती घेण्यात आले. यानंतर, मूर्तींना वीर येथील घोडेउड्डाण येथील नीरा नदीवर पवित्र स्नानासाठी नेण्यात आल्या. यावेळी आडाचीवाडी येथील श्री काळभैरवनाथ, मदनेवस्ती येथील मसनेर देवाच्या पालख्या, सुकलवाडी येथील पालखी वीर येथील घोडेउड्डाण येथे नीरा नदीवर जलाभिषेक घालण्यात आला.