वाल्हे – पुरंदर तालुका म्हणजे फळ बागांचा तालुका, सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब अशा अनेक फळांच्या बागा तालुक्यात आढळतात. वाल्हे जवळील आडाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी दिवाळीच्या लक्ष्मी पूजनच्या दिवशी या शेतकऱ्यांनी फळबागांची पूजा करून लक्ष्मी पूजन केले.
दीपावली लक्ष्मीपुजनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पैसे, सोने, चांदी, घर, वाहने यांची पुजा केली जाते. मात्र, आडाचीवाडी पिंगोरी येथील ग्रामस्थांनी पिढ्यानुपिढ्या एक नैसर्गिक परंपरा जपली आहे.
अंजिराचे गाव म्हणून ओखळले जाणाऱ्या आडाचीवाडी येथे अंजीर हिच लक्ष्मी समजून लक्ष्मी पुजनानिमित्त अंजिराच्या झाडांचे पूजन केले. तर पिंगोरी येथे सीताफळ बागेचे पूजन केले. या दोन्ही गावातील प्रत्येक सुवासिनी आपापल्या बागेतील झाडांची पुजन करतात.