हडपसर: किर्लोस्कर कंपनीत दोन दशकातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसमवेत उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांनी केले ‘ऋणानुबंध’ चे आयोजन केले होते.
हडपसर – येथील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडने गेल्या दोन दशकातील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेच्या भावनेचा सन्मान आणि साजरा करण्यासाठी “ऋणानुबंध” आयोजन केले. हा कार्यक्रम निमंत्रित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची तसेच गेल्या दशकातील संस्थेच्या प्रगतीचे साक्षीदार होण्याची संधी होती, असे मत कंपनीचे अध्यक्ष उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.
कंपनीच्या सभागृहात सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली तसेच किर्लोस्कर वारशाचे पायाभरणी करणारे दिग्गज लक्ष्मणराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर आणि चंद्रकांत किर्लोस्कर यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.अध्यक्ष राहुल किर्लोस्कर यांना सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी “मानपत्र” देऊन सन्मानित केले. व्यवस्थापकीय संचालक के. श्रीनिवासन, उपाध्यक्ष अमन किर्लोस्कर यांनाही सन्मानित करण्यात आले. राहुल किर्लोस्कर, के. श्रीनिवासन आणि संपूर्ण किर्लोस्कर न्यूमॅटिक अधिकारी संघाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि कौतुक केले.
दरम्यान, आदित्य कौशिक, देविदास घुले, राम शिंदे, शिवाजी पवार, प्रकाश जोशी, विकास घुले , एच आर मुस्तीकर, दादा देशपांडे व ए. एम. केळकर यांनी राहुल किर्लोस्कर यांना मानपत्र प्रदान केले. तसेच शाल, पुष्पगुच्छ, विठ्ठलाची मूर्ती व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींच्या वतीने श्रीशैल्य जकुणे, हेमाद्री बुझुक, देविदास घुले ,महादेव धर्मे यांनी आपल्या सेवाकालातील आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्षांनी सेवानिवृत्तांच्या चिरस्थायी योगदानाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली, तर व्यवस्थापकीय संचालकांनी कंपनीच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा दिला. हडपसर आणि सासवड येथील कारखान्याच्या पाहणीने, कंपनीतील नवीन घडामोडींचा साक्षीदार होऊन, कार्यक्रमाची सांगता झाली. स्वागत व प्रास्ताविक गणेश चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अनुराधा बिहाडे यांनी केले.