पुणे: क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक रणजित नाईकनवरे यांची बिनाविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष अनिल फरांदे यांच्याकडू रणजीत नाईकनवरे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत क्रेडाई पुणे मेट्रोच्या उपाध्यक्षपदी अमर मांजरेकर, मनीष जैन, आदित्य जावडेकर, राजेश चौधरी, विनोद चांदवानी, अरविंद जैन यांची तर अश्विन त्रिमल आणि तेजराज पाटील यांची यांची अनुक्रमे सचिवपदी व सह-सचिवपदी निवड करण्यात आली. आय. पी. इनामदार हे संघटनेचे नवीन कोषाध्यक्ष असतील.
कपिल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा जनसंपर्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने अखिल अगरवाल हे रेरा संदर्भातील विषय तर मनीष कनेरिया हे पर्यावरणाशी निगडित विषय हाताळतील.
व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यपदी बांधकाम व्यावसायिक जे. पी. श्रॉफ, संजय देशपांडे, अखिल अगरवाल, मनीष कनेरिया, संतोष कर्णावत, सतीश अगरवाल, सपना राठी, केतन रुईकर, दिलीप मित्तल, अनुप झमतानी, सिद्धार्थ मूर्ती, पुनीत ओसवाल, अभिषेक भटेवरा, वसंत काटे, ईशान मगर, कपिल त्रिमल यांची निवड करण्यात आली आहे.