पुणे (प्रतिनिधी) – लोहमार्ग पोलिसांनी दाखल असलेल्या गुन्ह्यातील सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम फिर्यादीस तात्काळ मिळवून दिले. लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेबद्दल फिर्यादी मनिषा पाटील यांनी मनापासून आभार मानले आहेत.
रोख दिड हजार आणि 26 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र त्यांना परत मिळाले आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भिमा हगवणे आणि टेके यांनी केला. पोलीस अधिक्षक सदानंद वायसे यांनी तपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आहे.