पुणे – अमृतमहोत्सवी वारसा लाभलेल्या भुसार बाजारातील व्यापार्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना मर्चंट्स चेंबरच्या अध्यक्षपदी रायकुमार नहार यांची निवड झाली आहे. तर, उपाध्यक्षपदी अजित बोरा, सचिवपदी ईश्वर नहार आणि सहसचिवपदी आशीष दुगड यांची निवड झाली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या.
मावळते अध्यक्ष राजेंद्र बाठिया, अजित बोरा, रायकुमार नहार, ईश्वर नहार, नवीन गोयल, उत्तम बाठिया, आशीष दुगड, दिनेश मेहता, मुकेश छाजेड, महिपालसिंह राजपुरोहित, संजय चोरबेले, विजय मुथा, कुणाल ओस्तवाल, मुकेश गोयल व सचिन रायसोनी या सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा शुक्रवारी झाली. त्यावेळी नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
चेंबरच्या सर्व माजी अध्यक्षांची एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा चेंबरच्या भूमिकेमध्ये समावेश होणार आहे. कार्यकारी मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून श्याम लढ्ढा, सुहास दोशी, निखिल मेहता व संदीप शहा यांची नियुक्ती झाली आहे. तसेच आमंत्रित सदस्य म्हणून अशोक अगरवाल, हरिराम चौधरी, मुकेश शहा, प्रकाश नहार, आशीष नहार, विजय नहार यांची नियुक्ती झाल्याची माहिती दी पूना मर्चट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.