कराड – व्याजाने दिलेल्या पैशांपेक्षा जास्त पैशांसाठी खाजगी सावकारांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून कराड येथील युवकाने झोपेच्या जास्त गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी शुभम ढेब उर्फ सोनू पवार, शुभम मस्के, नीलेश पाडळकर, दादा उर्फ जीवन म्हस्के (सर्व रा. सात शहीद चौक कराड), ओंकार गायकवाड (बैलबाजार रोड, मलकापूर), अथर्व चव्हाण (उंब्रज) आणि तेजस चव्हाण (आझाद चौक, कराड) यांच्यावर खासगी सावकारी प्रतिबंध कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चौघांना यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर नीलेश पाडळकर याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. शुभम ढेब-पवार, शुभम मस्के, दादा मस्के व तेजस चव्हाण यांना आधीच अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नीलेश पाडळकर याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.