पुणे, – पुणेमहापालिकेतर्फे दि. २७ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बाळांना पोलिओ डोस देणे बंधनकारक आहे. यावर्षी ही मोहीम एकाच सत्रात राबविण्यात येणार आहेत.
महापालिकेतील कार्यालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कोअर कमिटी आढावा बैठक झाली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती, सहाय्यक अधिकारी डॉ. वैशाली जाधव, लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, नोडल अधिकारी डॉ.
राजेश दिघे, यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते. अपेक्षित ३ लाख ११ हजार लहानग्यांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट असून, पाच दिवस सर्व प्रभागनिहाय हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मोहिमेसाठी ४ हजार ५५ स्वयंसेवक २८० पर्यवेक्षक, १५ मुख्य पर्यवेक्षक, तसेच आयुक्त पुणे महानगरपालिकेचे ९० डॉक्टर्स, ५ विभागीय अधिकारी, महानगरपालिकेच्या नर्सेस व इतर कर्मचारी व्यतिरिक्त खासगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य रोटरियन्स, नर्सेस कॉलेजचे विद्यार्थी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे, असे डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
कोठे मिळेल लस
आपल्या प्रभागात ठिकठिकाणी
■ शाळा, अंगणवाडी, बालवाडी इ.
■ रेल्वेस्थानक, बस स्थानक, उद्याने, महामार्ग
■ वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या, बांधकामाची ठिकाणे