पुणे – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालय युद्धपातळीवर हालचाली करत आहे. मात्र, एअरपोर्ट बंद असल्याने विद्यार्थ्यांना भारतात येण्यासाठी अडचण होत आहे.
दरम्यान, या अडचणींवर मात करण्यासाठी काही विद्यार्थी भारतीय दुतावासाच्या मदतीने बस मिळवून रोमानियाच्या बॉर्डरकडे निघाले आहेत. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील केतन दरेकर या विद्यार्थ्याने “प्रभात’ला ही माहिती दिली. केतन हा युक्रेनमध्ये मेडिकल शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकतो. त्याच्याबरोबर अनेक विद्यार्थी विनित्सिया शहरामध्ये शिकत आहेत. ते सर्व आता खासगी बस करून रोमानियाला रवाना झाले. तत्पूर्वी तेथील काही फोटो केतनने शेअर केले आहेत.
“तिकीट मिळालं, पण तोपर्यंत युद्ध सुरू झालं होतं…’; पुण्यातील आई-बाबा युक्रेनमधील लेकीच्या प्रतीक्षेत…
“डिजिटल प्रभात’चा वृत्तांत पाहण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा.