पुणे – आंतरजातीय विवाह केल्याने लपवून ठेवलेल्या विवाहितेला शोधून 8 नोव्हेंबरपर्यंत शोधून न्यायालयात हजर करा, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी.बिराजदार यांनी कोथरूड पोलिसांना दिला आहे.
याबाबत संकेत बनसोडे बनसोडे (वय 27 रा. कोथरूड) यांनी ऍड. रमेश खेमू राठोड यांच्यामार्फत न्यायालयात फौजदारी प्रक्रीया कलम 97 नुसार अर्ज केला होता.
तो मंजुर करत न्यायालयाने सर्च वॉरट काढले आहेत. या प्रकरणी ऍड. राठोड यांना ऍड. पूजा शांताराम वाघमोडे, ऍड. तृप्ती सोनटक्के आणि ऍड. सोनाली कछवाय यांनी सहाय केले.
सुरज आणि पत्नी शितल एकाच कंपनीत कामाला होते. पाच वर्ष ओळख होती. यातून प्रेम निर्माण झाल्याने दोघांनी विवाह केला. ती सुरजकडे नांदण्यास गेली. तिने लग्नाबाबात घरच्यांना सांगितले. त्यानंतर एके दिवशी माहेरचे लोक तिच्य घरी गेले.
तेथून तिला घेऊन गेले. घरी गेल्यानंतर पत्नी त्याला दिसली नाही. तिचा शोध घेतला. शेजारी राहणाऱ्या लोकांना विचारले. मात्र, काही कळलेच नाही. तिचा फोनही लागत नव्हता. काही दिवसांनी बहिणीच्या मोबाईलवरून तिचा मॅसेच सुरज याला आला.
आंतरजातीय विवाह केल्याने घरच्यांनी डांबून ठेवले आहे. मोबाइल काढून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिच्या घरच्यांशी संपर्क साधला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांकडून न्याय मिळाला नाही. त्यमुळे तिच्या जीवाला धोका आहे. घरचे तिचे लग्न लावून देतील म्हणून न्यायालयात ऍड. राठोड यांच्यामार्फत धाव घेतली.
पती-पत्नीचे नाते टिकावे, त्यांची भेट व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रकरणात घटनेचे गांभीर्य आणि दिलेले पुरावे पाहून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
– ऍड. रमेश खेमू राठोड, पतीचे वकील