ICC ODI World Cup 2023 India vs South Africa Virat kohli Century On Birthday : विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत भारत पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील.
#CWC2023 #INDvSA : अखेर प्रतीक्षा संपली, वाढदिवशी विराटनं केली सचिनच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी…
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर लागल्या होत्या. आज त्यांचा वाढदिवसही आहे. विराट 35 वर्षांचा झाला आहे. वाढदिवशीच विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले. विराट कोहलीने 119 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते तर या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये 49 शतके झळकावली आहेत. सचिनने 452 एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर विराटने 277 व्या एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली आहेत.
#CWC2023 #INDvSA : विराटचं विक्रमी शतक; भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे आव्हान….
या विश्वचषकात आतापर्यंत 8 सामन्यात विराटने 85 धावा, नाबाद 55, 16 धावा, नाबाद 103, 95 धावा, शून्य, 88 धावा आणि 101* धावा काढल्या आहेत. आज शतक झळकावून कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या वाढदिवशी शतक झळकावणारा सातवा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी ही कामगिरी केली आहे. रॉस टेलर, मिचेल मार्श आणि कोहली यांनी विश्वचषक सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.
ODI Cricket : वाढदिवशी शतक झळकावणारे खेळाडू
1. विराट कोहली – 101* विरूध्द दक्षिण आफ्रिका (05/11/2023)
2. मिचेल मार्श -121 विरुद्ध पाकिस्तान (20/10/2023)
3. टॉम लॅथम -140* विरुद्ध नेदरलँड्स (02/04/2022)
4. रॉस टेलर -131* विरुद्ध पाकिस्तान (08/03/2011)
5. सनथ जयसूर्या -130 विरुद्ध बांगलादेश (30/06/2008)
6. सचिन तेंडुलकर -134 विरुद्ध ऑस्ट्रेलिया (24/04/1998)
7. विनोद कांबळी -100* विरुद्ध इंग्लंड (18/01/1993)
विराट कोहलीची एकदिवसीय कारकीर्द…..
विराटने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांच्या 289 सामन्यांच्या 277 डावांमध्ये सुमारे 58 च्या उत्कृष्ट सरासरीने 13 हजार 626 धावा केल्या आहेत. यामध्ये 49 शतके आणि 70 अर्धशतके आहेत. 183 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.