पुणे – शिवाजीनगर भागातील “वडार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ “ या गणपती मंडळास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी भेट दिली व आरती केली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, मनविसेचे कार्यकारिणी सदस्य शैलेश विटकर, मनविसे शहराध्यक्ष अमोल शिंदे व अन्य पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान अमित ठाकरे यांनी शहरातील विविध गणेश मंडळाला ही भेटी दिल्या आहेत.