इंदूर – भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्सर पटेल (Aksar Patel) अद्याप दुखापतीतून (injury) सावरलेला नसल्याने भारतीय गोटात चिंता व्यक्त होत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीच हे संकेत दिले असून पटेलला तिसरा एकदिवसीय सामनाही खेळता येणार नसल्याचे समोर आले आहे.
आता त्याच्या जागी या सामन्यासाठी रवीचंद्रन अश्विनचे संघातील स्थान निश्चित मानले जात असून पटेल विश्वकरंडक स्पर्धेपूर्वीही तंदुरुस्त ठरला नाही तर 28 सप्टेंबरला अंतिम संघ निवडीत अश्विनला संधी मिळू शकते.
आयसीसीने आधी संघ निवडलेल्या देशांना ही अखेरची मुदत दिली आहे. त्यामुळे पटेलच्या जागी अश्विनला विश्वकरंडक स्पर्धेची लॉटरी लागू शकते.