लोणी काळभोर – अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड अनिता सूर्यकांत गवळी यांची निवड जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केली आहे.
गेली अनेक वर्ष ॲड अनिता गवळी या राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत आहेत. त्यामुळे त्यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे कामकाज जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली चालते. या परिषदेत शहर पोलीस, जिल्हा परिषद, ग्रामीण पोलीस, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन विभाग, दूरसंचार विभाग, वीज वितरण कंपनी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
एस टी, प्रादेशिक परिवहन विभाग, कृषी विभाग, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा माहिती अधिकारी आदी शासकीय विभागांबरोबरच ग्राहक संघटना, वैद्यकीय, व्यापार, शेतकरी यांचे अशासकीय प्रतिनिधी सदस्य असतात. या निवडीबद्दल परिसरातील नागरिकांनी अनिता गवळी यांचे अभिनंदन केले आहे.
अॅड अनिता गवळी –
‘या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या, अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्राहक कायद्याबद्दल जनजागृती, प्रचार व प्रसिद्धी करुन ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणार आहे’.