India Women vs England Women Test Match Day 3 : भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमधला एकमेव कसोटी सामना मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला गेला. या सामन्यात यजमान भारताने इंग्लंडचा 347 धावांनी मोठा पराभव केला. महिलांच्या कसोटीतील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. पाच दिवसीय कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच भारताने इंग्लंडचा पराभव करत इतिहास रचला. (TeamIndia’s historic Test win over England) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सामन्याच्या तीनही दिवस इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवले.
A mammoth 347-run victory for #TeamIndia in the one-off test 🙌🏻
Sensational performance in Navi Mumbai 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/UB89NFaqaJ #INDvENG |@IDFCFIRSTBank pic.twitter.com/nVgzVz4iLU
— BCCI Women (@BCCIWomen) December 16, 2023
भारताने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 428 धावा ठोकल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात 6 बाद 186 धावा करून डाव घोषित करण्यात आला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 131 धावांवर आटोपला. भारताने इंग्लंडसमोर 479 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्यासमोर इंग्लंडचा संघ अवघ्या 131 धावांत गारद झाला.
एकमेव कसोटीत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 428 धावा फलकावर लावल्या. शुभा सतीशने संघाकडून सर्वाधिक 69 धावा केल्या. याशिवाय जेमिमाह रॉड्रिग्जने 68, दीप्ती शर्माने 67 आणि यास्तिका भाटियाने 66 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव 136 धावांत गुंडाळला. यादरम्यान दीप्ती शर्माने पाच विकेट आपल्या नावावर केल्या. याशिवाय स्नेहा यादवने 2 विकेट्स घेतल्या. तर पूजा वस्त्राकर आणि रेणुका सिंग यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 6 विकेट गमावून 186 धावा फलकावर लावल्या आणि डाव घोषित केला. अशा प्रकारे भारताने इंग्लंडला 479 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 27.3 षटकांत 131 धावांत सर्वबाद झाला. दीप्ती शर्मानेही भारताकडून दुसऱ्या डावात चमक दाखवत 4 बळी घेतले. याशिवाय पूजा वस्त्राकर हिने 3 विकेट घेतल्या. याशिवाय राजेश्वरी गायकवाडने 2 आणि रेणुका ठाकूरने 1 बळी घेतला.
भारताचा ऐतिहासिक विजय…
भारतीय महिला संघाचा इंग्लंडविरुद्धचा हा एकूण तिसरा विजय आहे. यापूर्वी भारताने 2006 मध्ये टॉंटन आणि 2014 मध्ये वर्म्सले येथे इंग्लंडविरूध्द विजय मिळवला होता. त्याचवेळी महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या(347 धावांनी) बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला. यापूर्वी श्रीलंकेच्या महिला संघाने 1998 मध्ये पाकिस्तानचा 309 धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी न्यूझीलंडने 1972 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर 188 धावांनी विजय मिळवला होता.