पुणे – आता पुणे मेट्रोमधून विना तिकीट प्रवास करताना सापडला तर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यातयेणारासल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता फुकट्या प्रवाशांवर मेट्रोचे लक्ष असून, विना तिकीट प्रवास करणाऱ्याला दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हील कोर्ट दरम्यान मेट्रो मार्गाचा विस्तार झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढली आहे. मेट्रोचा सुरूवातीचा टप्पा असल्यामुळे मेट्रोकडून विना तिकीट प्रवास करताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जात नव्हती. पण, आता मेट्रो मार्गाचा विस्तार होऊन महिन्याला साधारण ५० ते ५५ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे मेट्रोकडून आता विना तिकीट आढळून आल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.