पुणे – मेट्रोसाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले असून, नागरिक मेट्रोतून प्रवास करण्यास पसंती देत असल्याचे दिसत आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या जानेवारी २०२४ मध्ये दरदिवशी सरासरी ५६ हजार ६३३ झाली आहे. ६ मार्च २०२२ मध्ये मेट्रोची सेवा वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर होती. त्यानंतर दरदिवशी प्रवासी संख्या केवळ २ हजार ५८२ होती, तर १ ऑगस्ट २०२३ पासून गरवारे महाविद्यालय ते रूबी हाॅल आणि पिंपरी-चिंचवड ते दिवाणी न्यायालय या मार्गावर सेवा सुरू झाल्यानंतर हा आकडा डिसेंबर २०२३ पर्यंत दैनंदिन सरासरी ५३ हजारांंवर स्थिरावला होता.
मात्र, महामेट्रोकडून १ जानेवारीपासून मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करत सकाळी आणि संध्याक़ाळी फेर्यांची संख्या वाढविली असल्याने जानेवारी महिन्यात प्रवासी संख्या ५६ हजार ६३३ वर पोहोचली आहे. ही वाढ मोठी नसली, तरी मेट्रोला पुणेकर पसंती देत असून, स्वारगेट ते दिवाणी न्यायालय आणि रूबी हाॅल ते रामवाडीपर्यंतचा मेट्रो मार्ग मार्चअखेर पर्यंत सुरू झाल्यानंंतर मेट्रोची प्रवासी संख्या लक्षणीय स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे. तर मेट्रोची सेवा सुरू झाल्यापासून गेल्या दीड वर्षात सुमारे १ कोटी प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.
विस्तारीत मार्गानंतरची प्रवासी स्थिती
ऑगस्ट, २०२३ – ६६,०३२
सप्टेंबर, २०२३ – ६५,५४२
ऑक्टोबर, २०२३ – ५३,९८७
नोव्हेंबर, २०२३ – ४७,२९२
डिसेंबर, २०२३ – ५३,२६८
जानेवारी, २०२४ – ५६,६३३
फेर्या वाढविल्याचा फायदा
मेट्रोने दोन्ही मार्गावरील गाड्यांची सरासरी गर्दीच्या वेळेत ७.५ मिनिटे नॉन पिकअप अवर्समध्ये १० मिनिटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला, सध्याच्या गर्दीच्या वेळेत १० मिनिटांच्या सरासरी विरुद्ध गर्दीच्या वेळेत १५ मिनिटे, पीकअप तास आणि वाढ मेट्रो ट्रेनच्या फेऱ्यांची संख्या १६१ ते २२४ झाली आहे, ज्यामुळे दररोज सरासरी प्रवासी संख्येत वाढ होत आहे.