पुणे – महापौर मुरलीधर मोहोळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, त्यांना 15 जुलैपर्यंत होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांचे कुटुंबीय मात्र अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. महापौरांना 4 जुलै रोजी करोनाची लागण झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले होते. त्यांना ताप आल्याने त्यांनी कोविड 19 ची टेस्ट केली होती.
कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या १५ तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे. pic.twitter.com/Q4gV5dSkDP
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 9, 2020