माले, (मालदीव) – मालदीवमध्ये लवकरच भारतीय रुपेकार्डच्या वापराला सुरुवात होणार आहे. यया पुपे कार्डच्या वापरामुळे मालदीवच्या रुफियाला म करसमर्थ करण्यास मदत मिळेल, असे मालदीवच्या वरिष्ठ मंत्र्यांनी म्हटले आहे.
संपूर्ण भारतातील एटीएम, पीओएस डिव्हाइसेस आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सवर व्यापक मान्यता असलेले रुपेकार्ड हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे उत्पादन असलेले भारतातील पहिले जागतिक कार्ड पेमेंट नेटवर्क आहे.
मालदीवचे आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांनी भारत आणि चीन या दोघांनी द्विपक्षीय व्यापारात स्थानिक चलन कसे वापरण्यास सहमती दर्शवली आहे याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी भारताचे रुपेकार्ड आगामी काळात वापरायला सुरुवात केली जाणार असल्याचीही घोषणा केली.
मात्र हे कार्ड कधीपासून वापरायला सुरुवात केली जाणार याचा तपशील जाहीर केला गेलेला नाही. मालदीवचे तत्कालिन अध्यक्ष मोहम्मद सोलिह ऑगस्ट २०२२ मध्ये भारतभेटीवर आले असताना रुपे कार्डच्या वापराबाबत सहमती झाली होती.