चंदीगड – हरियाणात आता इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे बोर्ड परीक्षा द्यावी लागणार आहे. वर्ष 2009-10 मध्ये शेवटची इयत्ता आठवीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली होती. 11 वर्षांनतर आता पुन्हा हरियाणा शिक्षण बोर्डाच्या सचिवांना आठवीची बोर्ड परीक्षा घेण्यासंबंधी सरकारने आदेश दिले आहे.
हरियाणात बोर्डाच्या 10वी आणि 12 वी इयत्तांच्या परीक्षा घेतल्या जातात. राइट टू एज्यूकेशन ऍक्ट लागू झाल्यानंतर दहा वर्षंपूर्वी आठवी इयत्तेची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली होती. इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करू नये या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची भीती राहिली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. याकारणामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत चालला असून आणि 10वी, 12वीचे बोर्डाच्या निकालावर याचा परिणाम होत आहे.