पुणे – काल मध्यराञी ०१: ४८ वाजता गंगाधाम फेज ०२, विंग जी -०५ येथे सातव्या मजल्यावर सदनिकेत आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अग्निशमन दल नियंत्रण दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द व मुख्यालयातून तीन फायरगाड्या व एक वाॅटर टँकर अशी एकूण ०६ अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सात मजली इमारतीत सातव्या मजल्यावर चार खोल्या असलेल्या एका सदनिकेत आग लागली असून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला आहे. जवानांनी तातडीने वर धाव घेत होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा सुरु करत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी आतमध्ये कोणी आहे का ? याची खाञी केली असता बाल्कनीमध्ये कुटूंबातील एकुण पाच जण अडकून पडल्याचे निदर्शनास आले. यामध्ये एक जेष्ठ महिला, एक दांपत्य व त्यांची दोन लहान मुले असून जवानांनी या सर्वांना सुखरुप बाहेर घेत त्यांची सुखरुप सुटका केली.
सुमारे 30 मिनिटात आगीवर नियंञण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण सदनिकेत पुढील खोलीमध्ये असणारया पेटत्या दिव्यामुळे लागली असा प्राथमिक अंदाज असून सदनिकेतील सर्व गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाची मदत वेळेवर पोहोचल्याने जवानांनी आग इतरञ पसरु न दिल्याने मोठा धोका टळला. सदर इमारतीत असलेली स्थायी अग्निशमन यंञणा या घटनेवेळी कार्यान्वित नसल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले.
या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके व प्रभारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास वीस जवानांनी सहभाग घेत पाच जणांचे जीव वाचविण्यात यश मिळवले.