पुणे -“आम्ही कोथरूडकर’तर्फे 24 सप्टेंबरपासून आयोजित दोन दिवसीय “कोथरूड गणेश फेस्टिव्हल’मध्ये वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवता येणार आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्योगमंत्री उदय सामंत या वेळी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात उद्योजक केशव बेडेकर, आंतरराष्ट्रीय उद्योजक डॉ. जितेंद्र जोशी, बॅंकिंग तज्ज्ञ शिरीष देशपांडे, तबलावादक विजय घाटे, संगीतकार-गायक सलील कुलकर्णी, अभिनेता-दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट्सचे संजय चोरडिया यांना कोथरूड सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. “आम्ही कोथरूडकर’ मध्ये संदीप खर्डेकर, सुनील महाजन, दीपक मानकर, मंदार जोशी आणि किरण साळी यांचा सहभाग आहे.
महोत्सवातील कार्यक्रम
24 सप्टेंबर रोजी होणारे कार्यक्रम
मराठी नाटक “संज्या छाया’ (वेळ – सायं. पाच)
“मराठी हास्यकवी संमेलन’ (वेळ – रात्री नऊ)
25 सप्टेंबर रोजी होणारे कार्यक्रम
“कोथरूडच्या सौ. सौभाग्यवती’ – (वेळ दु. 12)
“मराठी पाऊल पडते पुढे’ – (वेळ – सायं. पाच)
आयुष्यावर बोलू काही – (वेळ – रात्री नऊ)