आळंदीतील सुतार समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
आळंदी – सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून यासाठी 50 कोटी रुपयांचे निधी तातडीने मंजूर केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिले.
विश्वकर्मा सुतार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा आळंदी देवाची येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समाज महामेळाव्यात सहभागी बांधवांसोबत संवाद साधला . यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, डॉ. संजय रायमुलकर (मेहकर), शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, विश्वकर्मीय सुतार समाजाचे मुख्य प्रशासकीय राज्य समन्वयक प्रा. विद्यानंद मानकर,
पी. जी. सुतार, राज्य समन्वयक दिलीप अकोटकर, हनुमंत पांचाळ, रवींद्र सुतार, प्रदीप जानवे, आनंद मिस्त्री, विजय रायमूलकर, भगवान राऊत, संजय बोराडे, नारायण क्षीरसागर, गणपत गायकवाड, अरुण सुतार, अर्जुन सुतार, विलास भालेराव, नारायण भागवत, शिवाजी सुतार, विवेकानंद सुतार, ज्ञानेश्वर सुतार, मधुकर सुतार, बाळासाहेब सुतार, दत्ता सुतार, भगवान श्राद्धे, प्रकाश बापर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या महामेळाव्यास राज्यातील सुमारे साडे आठ नागरिक आले होते.
मेळाव्याच्या उद्घाटनपूर्वी हभप संतोष महाराज ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीतून बाराशे बाल वारकर्यांसह संत भोजलिंग काका प्रासादिक दिंडी काढण्यात आली. तसेच ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्टला 2 किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्याबद्दल दत्तात्रय सुतार (इचलकरंजी) यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
12 मागण्यांसाठी स्वतंत्र बैठक घेणार
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणत्याही वास्तूची उभारणी करायची असेल तर सुतारा-शिवाय पान हलत नाही. सुतार समाजाच्या 13 मागण्यांपैकी महामंडळ स्थापनेची घोषणा करतो तर उर्वरीत 12 मागण्यांसाठी एक स्वतंत्र बैठक घेवून सकारात्मक निर्णय दिला जाईल,असे संकेत त्यांनी यावेळी दिले.