पुणे – घटस्फोट देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने भर कौटुंबिक न्यायालयातच पत्नीच्या तोंडावर जोरात बुक्की मारुन तिचा दात पडल्याचे घटना नुकतीच शिवाजीनगर येथील कौंटुंबिक न्यायालयात घडली. याप्रकरणी पोलिसांनी सचिन विकास पवार (34 , रा. खेसे पार्क , विमाननगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी आणि आरोपी हे पतीपत्नी आहेत. दोघेही सध्या वेगळे रहात आहेत. घटस्फोटाच्या केसच्या कौन्सिलिंगसाठी ते शनिवारी शिवाजीनगर येथील कौटुबिक न्यायालयात आले होते. यावेळी समुपदेशन केंद्रात पत्नीने सचिनला घटस्फोट देण्यास नकार दिला. त्यानंतर ते केंद्राच्या बाहेर आल्यावर सचिनने पत्नीच्या तोंडावरजोरात बुक्की मारली.त्यात तिचा एक दात पडला व जबड्याला जखम झाली.