रांजणगाव गणपती – येथील पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या सिलिंडर साठवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत विजय गजानन शिंदे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.
याप्रकरणी दिनेश पुनाराम बोला (वय 30, सध्या रा. कारेगाव), व सुनील ओमप्रकाश इसरवाल या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूण 1 लाखाहून अधिक रुपयांचा अवैध्यरित्या साठा सापडला असून, पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.