पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी आडते मतदार संघातील दोन जागांवर जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गणेश घुले यांना ५ हजार ८५२ एवढी मते तर अनिरुद्ध भोसले यांना ५ हजार ८१६ एवढी मते मिळाली. व्यापारी अडते मतदार संघात १३ हजार १७४ मतदाना पैकी ८ हजार ७०७ (६६.०९) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता.
पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते –
कुंजीर सौरभ शेखर 1640
गावडे अशोक रामभाऊ 128
घुले अमोल मुरलीधर 374
बडदे रमेश बळवंत 32
बनसोडे सुहास मारुती 19
बागवान उमरफारुक 159
बाळासाहेब भिसे 194
विलास भुजबळ 650
अविनाश शेवते 38
शिवाजी सुर्यवंशी 1270
या मतदार संघातील वैध मते ८ हजार २९१ असून ४१६ अवैध मते असल्याचे घोषित करण्यात आले. विजयाच्या घोषणेनंतर गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.